Ad will apear here
Next
महाराष्ट्राच्या अंतरिम अर्थसंकल्पाचे दानवेंकडून स्वागत
मुंबई : ‘राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प शेती, सामाजिक न्याय, वीजपुरवठा, पायाभूत सुविधा व ग्रामविकासाला चालना देणारा असून आपण त्याचे स्वागत करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे राज्याच्या विकासाला मिळालेली गती यामुळे कायम राहील,’ अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी २७ फेब्रुवारी २०१९ रोजी व्यक्त केली.

पाटील-दानवे म्हणाले, ‘अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाबद्दल आपण त्यांचे अभिनंदन करतो. कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी तीन हजार ४९८ कोटींचा निधी, कृषी पंपांना विद्युत जोडणी देण्यासाठी ९०० कोटींचा निधी, सहकारी संस्थांच्या कृषी व कृषीपूरक व्यवसायाला साह्य करण्यासाठी ५०० कोटींच्या अनुदानाची तरतूद, सर्वसामान्य लोकांच्या प्रवासाचे साधन असलेल्या एसटीच्या ९६ बसस्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी २७० कोटी रुपये अशी अंतरिम अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत.’

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र ठरण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा आठ लाख रुपये करण्यात आली आहे; तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे भागभांडवल ४०० कोटींनी वाढविण्यात येणार आहे; तसेच ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या कल्याणासाठीच्या विविध योजनांसाठी दोन हजार ८९२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रस्ते, वीजपुरवठा, मेट्रो, घरबांधणी अशा विविध क्षेत्रांसाठी या अंतरिम अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZHQBX
Similar Posts
‘समाजातील उपेक्षितांना न्याय देणारा अर्थसंकल्प’ मुंबई : ‘अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी मांडलेला राज्याचा अर्थसंकल्प शेतकरी, युवक व व्यावसायिकांना साथ देण्याबरोबरच ओबीसी, धनगर या समाजघटकांना आणि उपेक्षित महिलांना न्याय देणारा आहे,’ अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील-दानवे यांनी व्यक्त केली
भाजपच्या प्रत्येक जिल्हा शाखेतर्फे दुष्काळग्रस्त भागात सेवाकार्य मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सर्व लोकप्रतिनिधी राज्यातील दुष्काळ असलेल्या जिल्ह्यांतील चारा छावण्यांना भेट देतील आणि ‘भाजप’ची प्रत्येक जिल्हा शाखा दुष्काळग्रस्त भागात सेवाकार्य करेल, असा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेण्यात आ
‘सदस्यता अभियानात भाजप समाजाच्या सर्व घटकांना जोडणार’ मुंबई : ‘लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा संघटनेच्या विस्तारासाठी सज्ज झाला असून, सदस्यता अभियानामार्फत भाजप समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, अल्पसंख्य, प्रगत, मागास, गरीब, श्रीमंत अशा सर्व घटकांना पक्षाबरोबर जोडून घेईल,’ असे भाजप सदस्यता अभियानाचे राष्ट्रीय
निवासी शाळा योजनेबद्दल ‘भाजप’ सरकारचे आभार मुंबई : राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध वर्गातील शालेय विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळांना साह्य करण्यासाठी राज्य शासनाने अलीकडेच शाहू-फुले- आंबेडकर अनुसूचित जाती-नवबौद्धांसाठी निवासी शाळा ही नवीन योजना लागू केली आहे. याबद्दल महाराष्ट्रातील शेकडो संस्थाचालकांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सरकारचे आभार मानले आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language